गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ।।१।।

कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टाचार आहे. मंगलाचरण करण्याच्या २-३ पद्धती आहेत. ग्रंथाच्या विषयाचें स्वरूप स्पष्ट करणें हेंहि एक प्रकारचें मंगलाचरणच मानलें जातें. इष्ट देवतेला नमस्कार करणें हे मंगलाचरणाचें स्वरूप अधिक लोकप्रिय असें आहे. समर्थ या ठिकाणीं पहिल्या ३ ओळींत नमस्काररूप मंगलाचरण करीत आहेत. तर चवथ्या ओळींत त्यांनी वस्तुनिर्देशरूप मंगलाचरण केलें आहे.

अंगीकृत कार्य निर्विघ्नपणे पार पडावें हा मंगलाचरणाचा हेतू आणि गणेश हा स्वभावत:च विघ्नहर्ता, त्यामुळें समर्थांनीं ग्रंथाच्या आरंभी गणपतीलाच वंदन करून मंगलाचरण केलें आहे. आपण श्रीगणेशाय नम: म्हणतो, कार्याचा श्रीगणेशा झाला म्हणतो. यावरून गणेशाचें माहात्म्य लक्षांत येतें. देवपूजेच्या वा प्रत्येक मंगलकार्याच्या आरंभीं गणपतिपूजन-निदान स्मरण तरी केले जातेंच. त्याच्या मागचें कारण भावनिक आहेच पण सांस्कृतिक आणि सामाजिकहि आहे. आज ज्या तात्त्विक कारणासाठी आपण चांगल्या अर्थानें लोकसत्तेचा उदो उदो करीत असतों त्याचें प्रतीक गणेशरूपांत आहे. हा देव गणपति आहे. गणांचा, समूहाचा, लोकांचा तो नेता आहे. रक्षणकर्ता आहे, शास्ताहि आहे. मात्र तो तांत्रिक पद्धतीनें केवळ निवडणूक जिंकल्यामुळें झालेला पुढारी नाही. तो गुणांचाहि ईश आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणीं समूहाच्या, समाजाच्या, लोकांच्या, गणांच्या नेतेपदीं आरूढ होण्यास योग्य ठरविणारे बुद्धिमत्ता, बहुश्रुतता, सूक्ष्मदृष्टि, उद्यमशीलता, क्षमाशीलता, दृढता, शौर्य, धैर्य, कर्तृत्व, सामर्थ्य, लोकसंग्रह, नि:स्वार्थता इत्यादि इत्यादि अनेक गुण व सद्गुण, उत्कृष्टरीतीनें आहेत, उत्कटतेनें आहेत. हे सद्गुण त्याच्याजवळ नम्र सेवकांप्रमाणें विनयानें राहतात, तो जणूं त्यांचा स्वामी आहे आणि म्हणून तो गणाधीश झालेला आहे. निर्गुणाची सगुणांत येण्याची इच्छा ज्याच्या रूपानें साकारली, तो जो आद्यप्रणव ॐकार हें गणेशाचेंच प्रतीक आहे. श्रीज्ञानेश्वरांनीं "अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडळ । मस्तकाकारें ।।" (ज्ञा. १।१९) असें म्हणून तें स्पष्ट केलें आहे. ॐकाराची आकृति आपण नेहमीं आडवी रेखाटतो. ती जर उभी रेखाटली तर एकदंत गजाननाच्या मुखाच्या आकृतीशीं तिचें सादृश्य अगदीं जवळिकेचें आहे हें सहज लक्षांत येईल. म्हणून समर्थ या गणेशरूपालाच निर्गुणाच्या आरंभिण्याच्या इच्छेचा मूळारंभ म्हणतात.

सृष्टीच्या सर्व भावांचे किंवा सृष्टीतील सर्व भावांचें तो मूलस्थानहि आहे आणि ईशहि आहे.

आपल्या पातळीवर चांगल्या-वाईटाचा, त्याज्य-ग्राह्याचा जणू याच्याशी संबंध नाहीं असें सुचविण्यासाठी समर्थ सर्वा गुणांचा म्हणतात. कारण मुळांत चांगलें व वाईट कांहीं नसतें. सृष्टींत, सगुणांत, आकारांत वस्तूंत जें कांहीं असतें ते मूलत: एकापेक्षां दुसरे फार तर वेगळें असते पण चांगलें किंवा वाईट नसतें. त्याचें चांगुलपण किंवा वाईटपण हें नंतरच्या उपयोगावर कोठें, किती, काय, कसें, कोणाला आणि कां या परस्परसंबंधांतून आकाराला येत असते. कामक्रोधहि नसून चालणार नाहींत आणि नुसत्या भावभक्तीनें व्यवहार निभणार नाहीत. गहूं- तांदळाप्रमाणेंच ईशसृष्टीत अफू-सोमलालाहि स्थान आहे. एरवी विष म्हणून त्याज्य असलेली अनेक द्रव्यें रोग नाहींसा करण्याच्या दृष्टीने प्रभावी असतात, म्हणून स्वयंपाकघरांत तिरस्कारार्ह असलेले विष वैद्याच्या हातांत औषध ठरतें. कोणाला केव्हां व कां याचा विचार करून वैद्य कसें, काय व किती ठरवितो, म्हणून विषहि अमृतासारखे कार्य करतें. निर्गुणाचा मुळारंभ म्हणण्यात वाईट- चांगले, त्याज्य-ग्राह्य याचें पलीकडे असलेल्या मूळतत्त्वाचा बोध आहे व त्याच रूपांत समर्थ गणेशाला वंदन करतात. आरंभाचा मुळारंभ म्हणण्यात केवळ शुद्ध तत्त्व हें सृष्ट्युन्मुख झालें आहे असेंहि सुचविलें जाते. नमस्कारासाठीं, भक्तीसाठीं, प्रगतीच्या ध्येयासाठीं, भावाच्या सगुण आलंबनासाठी तत्त्व या अवस्थेंतच असले पाहिजे.

समर्थ गणेशानंतर, विद्येची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रसिद्ध असलेली जी शारदा, सरस्वती तिला वंदन करीत आहेत. ज्या नमू शब्दानें वंदन सुचविलें जातें तो नमू शब्द दोघांच्याहि, गणेशाच्या व शारदेच्याहि वंदनाचा वाचक आहे. उंबर्‍यावर ठेविलेला दिवा जसा दोन्ही खोल्यांना प्रकाशित करतो तोच देहली- दीप-न्याय येथेंहि आहे असें समजावें. आदिशक्ति, आदिमाया, शारदा जी परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी या चारी वाणीचें मूलस्थान आहे तिला येथें वंदन केलें आहे. वाणी, शब्द, ध्वनि ही स्पंदाची स्फुरणारी परिणत स्वरूपें आहेत. स्पंदाचा किंवा स्फुरणाचा तो पहिला परिणाम आहे असेंहि म्हणता येईल. जगताच्या आरंभी शब्द होता कारण तेंच ब्रह्माचें पहिलें स्फुरण होतें असें कांहीं शास्त्रकार मानतात. जगताच्या मुळाचा शोध घेण्यास प्रवृत्त झालेले विज्ञान कांहींजणांच्या मते तरी आद्यस्पंदापर्यंत जाऊन पोंचलें आहे. आपल्या वैदिक परंपरेंत वेदवाणी जगताच्या आरंभी प्रकट झाली अशी धारणा आहे.

ॐकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण: पुरा ।
कण्ठं भित्त्वा बहिर्यातौ तस्मान्मांगलिकावुभौ ।।

हें मतहि शब्दाच्या आद्यतेचेंच द्योतक आहे. स्पष्ट अशा वाणीची विभागणी संकल्प, भावना, विचार, शब्द अशा क्रमाने केल्यास ब्रह्माच्या "एकोऽहं बहुस्याम् प्रजायेय" या संकल्प-भावना-विचाराचाहि आद्यस्फुरणांत समावेश होऊं शकतो. शारदेला या सर्वांचें मूळ म्हणून समर्थ चिच्छक्ति, माया, आद्यप्रकृति या ब्रह्माच्या अभिन्न शक्तीचा बोध करीत आहेत.

मूलतत्त्वांना हा नमस्कार कशासाठी करावयाचा तर कार्य निर्विघ्नपणें पार पडावें यासाठीं. हें कार्य कोणतें? तर राघवाच्या अनंत मार्गाला लागण्याचें. सर्व मनाचे श्लोक माणसाला या मार्गाच्या प्रवासासाठीं प्रवृत्त करण्याकरितां, या मार्गाने चालणाराला प्रोत्साहन देण्याकरितां निर्माण झाले आहेत. हा मार्ग अनंत आहे. कधीहि न संपणारा आहे. आलों, पोचलों, असें वाटणें हा या मार्गावरचा अडथळा ठरतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात– त्याप्रमाणें प्रत्यक्ष महेशहि, भगवान शंकरहि, या मार्गाचा अजून कापाडीच आहे. (ज्ञा. ६।१५३) वाट सुरूच आहे. प्रवासीच आहे. हा मार्ग कधीं संपत नाहीं. याचें कारण या मार्गाचें ध्येय, साध्य जें परब्रह्म तेंहि नि:सीम, अमर्याद, अनंत आहे. समर्थांचा राघव हा दशरथाचा पुत्र म्हणून ज्ञात असलेला ऐतिहासिक पुरुष नव्हे. हा राघव परमात्मारूप आहे. हें परब्रह्म आमच्याकरितां राघवाच्या, रामचंद्राच्या रूपाने प्रकट झाले इतकेंच. या राघवापर्यंत आपणास जाऊन पोचावयाचें आहे. मनाच्या श्लोकांनी सांगितलेला मार्ग त्याच्याकडे पोंचविणारा आहे. अशा अति अवघड कार्याला लागण्यापूर्वी सगुण साकार परब्रह्मरूप गणेश आणि चैतन्यासकट वाणीला, वैखरीला, प्रेरणा देणारी आदिशक्ति शारदा यांना विनयानें, प्रेमादरानें, भक्तिभावाने नमस्कार करून वा नमस्कार करा असें सांगून समर्थ जणूं साधकांसाठी त्यांचा आशीर्वाद मागत आहेत आणि मग म्हणत आहेत चला, आता कामाला लागू या. या अनंत असलेल्या राघवाच्या न संपणार्‍या मार्गास आपणास लागावयाचे आहे. चला–ती वाट धरूं या.

जिथे, ज्याकडे जावयाचें आहे तें समर्थांना जणूं प्रत्यक्ष समोर उभे आहे आणि म्हणून समर्थ समोर असलेल्या राघवाकडे बोट दाखवून म्हणत आहेत, या राघवाच्या मार्गाला लागू या.

पूर्ण ब्रह्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ असलेल्या समर्थांना त्यांचें दैवत सदासर्वदा प्रत्यक्षच आहे आणि म्हणून त्यांनीं "करी रे मना भक्ति या राघवाची ।" (म. श्लो. २६) "करी रे मना ध्यान या राघवाचें" (म. श्लो. ६६) "घनश्याम हा राम लावण्यरूपीं" (म. श्लो. ६७) "करी काम नि:काम या राघवाचें" (म. श्लो. ७७) "नभासारखें रूप या राघवाचे" (म. श्लो. १९७) असा आपल्या दैवताचा उल्लेख ते प्रत्यक्ष समोर असल्याप्रमाणें अनेकवेळां केला आहे. समर्थांसारख्या थोर सत्पुरुषांचें ऐकावयाचें तें यासाठींच. त्यांचें ज्ञान हें केवळ शब्दज्ञान नाहीं. तें पांडित्याचें प्रतीक नाहीं. तें साक्षात्काराला आलेल्या अनुभवातून उमटलेलें आहे. प्रत्यक्ष पुढें असलेल्या वस्तूचा बोध करणारें आहे.

मंगळाचरण झालें आतां प्रत्यक्ष उपदेश |

Gaņādhīsh, the beloved of all characteristics |
Root cause at the inception of all that is Formless ||
I bow to Shāradā, the source of four voices |
On this Rāghavā's path of unending progress ||1||

To begin any task with a suitable benediction is part of tradition. There are 2-3 different approaches to presenting a benediction. Describing the nature of the subject of the text is one such approach. Saying a prayer to a chosen deity is the more popular form. In the first three lines, Samartha is using the latter form of offering a prayer, while in the last line he uses the purpose-outlining form of the benediction.

The purpose of this supplication is so that the task undertaken may be completed without obstacles. Gaņesha is the natural remover of impediments, and so Samartha has appealed to Gaņapati at the beginning in this shlōka. We often say, "I pray to Shri Gaņesha", or say that the 'Shri Gaņeshā' of a particular task has taken place. This shows the importance of Gaņesha. At the beginning of any worship, or at the commencement of an auspicious task there is a prayer to Gaņapati - or at the least, there is a brief reflection upon him. The reason behind this is not only emotional, but also traditional and cultural. Today, the essential reason, for which we rightfully praise the benefits of democracy, can be found in the image of Gaņapatī. This deity is Gaņa-patī, or the people's lord. He is at the head of collectives or groups of people. He is their protector as well as governor. He however, isn't a leader in the narrow technical sense of having won an election. He personifies the qualities that are appropriate and necessary to rise to leadership of groups, societies, and collectives of people, qualities such as intelligence, mass-appeal, perspicaciousness, enterprising nature, forgiveness, strength, valor, courage, gratitude, competence, ability to bring people together, selflessness etc. He represents all such qualities which exist in their most ideal, and most abundant form. These qualities stand as polite and deferential servants behind him, as if he were their master, and therefore he is the Gaņādhīsh, or leader of the masses. When that Primordial Source, the Formless Pranav, symbolized as Aum (ॐ) desired to manifest itself, it accomplished so in the form of Gaņapatī. Shri Dnyāneshwar has explained it as such: "The letter 'a' (अ) is a pair of feet, the 'u' (ऊ) a large belly, and the 'm' (ँ) character in the form of a great head. (Dnya 1/11). We typically draw the letter Aum (ॐ) on its side. If we turn the glyph on its end, it is very closely reminiscent of the stylized figure of the one-tusked, elephant-faced one. That is why Samartha refers to the form of Gaņesha as the root cause behind the intent of the Formless to materialize.

He is both the motivation of all expressions of creation, as well as the constituent of all manifestations in creation.

Samartha refers to 'all attributes` to indicate that he is not associated with the good-vs-bad, repudiation-vs-embrace dualities perceived at our level, because in principle there is nothing that is good or bad. In its essence, one object may certainly differ from another in its creation, qualities, or form, but it is not inherently good or bad. Its beneficial or evil effects arise from its subsequent use and its direct relationship with the where, how much, what, for whom and why. It won't do to be rid of lust and anger, nor will just pious behavior to each other suffice. Like wheat and rice, nature also reserves a place for opium and magic mushrooms. So many commonly avoided poisonous substances yield extracts that are powerful therapeutics against diseases. These poisons that are deservedly abhorrent in a kitchen, turn into medicine at the hands of a doctor. By considering for whom, when and why, a doctor decides the manner, form and quantity, and so poison also acts as if it were ambrosia. In saying the 'root cause at the origin', it is meant to signify the essential form of Gaņesha that is beyond good-and-bad or avoidable-desirable, and Samartha is praising that very form. By the root of origination, it is also being indicated that pure 'is-ness' alone is what has emerged into existence. For the purposes of paying obeisance to, for the goal of progress, and for the appreciation of qualities, the Formless must be in the state of existence.

Following Gaņesha, Samartha proceeds to praise Shāradā, or Saraswatī, famously the goddess with dominion over knowledge. The phrase `I bow' is placed in the middle to address both Gaņesha and Shāradā simultaneously. Just as a lamp placed on a threshold illumines both rooms together, the same idea is to be understood here. The primary energy, the mother-cause Shāradā, who is at the locus of the four voices called Parā, Pashyanti, Madhyamā and Vaikharī, is being praised here. Voice, speech or sound are the end result of a pulsating vibration. One might also say that this is the first effect of the vibration. Some philosophers hold that at the beginning of creation there was the word, because this was the first quickening of Brahma. Some scientists seeking the origin of the universe have also reached the opinion at at the beginning there was a primordial vibration. In our Vedic tradition it is held that at the Vedas revealed themselves at the beginning of creation.

Thus long ago, the dual, Aum and the Sound |
Erupted forth as Brahman's voice, those auspicous two ||

This opinion is also indicative of the same primacy of word. When clear speech is analyzed into the progressive steps of intent, emotiveness, thought and word, then Brahma's "I am one, let me be many" can be understood as the quickening that includes the first three steps of intent-motivation-thought. Samartha is praising Shāradā as the undifferentiated energy of consciousness, creativity and as the primary nature of Brahma.

The primary reason behind the exaltation is of course so that the task is accomplished without hindrance. What is this task? It is to commence on the unending path of Rāghava. All of the Manāché Shlōk have been created to inspire humanity to journey along this path, and as encouragement to progress along this path. This road is infinite. It never reaches an end. A feeling of having arrived, or reached proves to be an obstacle along this path. Shri Dnyāneshwar Mahārāj says that even Mahesh, Bhagavān Shankar himself is still a sojourner along this path (Dnya. 6/153). The journey is ongoing. This road has no end because the goal or destination of this path, the Absolutely Reality is itself without limits, infinite and unending. Samartha's Rāghav is not the historical figure known as Dasharatha's son. This Rāghava is the form of the Formless. It's just that this Absolute Reality revealed itself to us in the form of Rāghava, or Rāmachandra. We are to be delivered to this Rāghava. The path described in the Manāché Shlōk is one that leads to Him. In order to start on this incredibly difficult task, Samartha, with all politeness, love and respect, and with great devotion, lauds, or asks us to worship, the qualified, concrete form of the Absolute in Gaņesha, and the primordial energy of consciousness in Shāradā that invigorates voice and speech. It is as if he is asking for blessings on behalf of seekers, and then saying, let's get to work. We now have to embark upon this unending journey of this infinite Rāghava. Let's join this path!

One feels as if the destination and objective of this journey is clearly visible to Samartha, as if Samartha is pointing directly at Rāghava before him and saying, let us join on the journey to Rāghava.

Samartha is someone who is entirely devoted to the Absolute, and in possession of the complete knowledge of the Absolute, and as such his chosen deity is always and forever available to him. On several occasions, he has referenced his deity as if he were in His presence. For instance, "O mind, devote thyself to this Rāghava" (MS 26), "O mind, focus on this Rāghava" (MS 66), "Dark complexioned, attractive form of this Rāma" (MS 67), "Do the effortless work of this Rāghava" (MS 77) and "Sky-like form of this Rāghava" (MS 197). Great saints like Samartha should be listened to for no reason other than this: Their knowledge is not just of words. It is not measure of scholarship. It is an impression of first-hand experience of realization. It is an exact indicator of the destination that awaits.

The benediction is complete, onward to the instruction!