← Manobodh

Preface

।। श्रीशंकर ।।

मनोबोध-विवरण

समर्थ रामदासस्वामींच्या मनोबोध या प्रकरणाचा विशेष विचार आपण आतां करणार आहोत. दोनशें पाच श्लोकांचें हें लहानसें प्रकरण आहे. परंतु संपूर्ण समर्थ-वाङ्मयाचें तें सार आहे. मनाचे श्लोक या नावानेंहि हें प्रकरण प्रसिद्ध आहे. समर्थ-वाङ्मय तसें पुष्कळ विस्तृत आहे, प्रचंड आहे. स्वयंपाकघरांतील चटणीमिठापासून अध्यात्माच्या परमोच्च अनुभवापर्यंत जीवनावश्यक अशा सर्व गोष्टींचे मार्गदर्शन समर्थ-वाङ्मयानें ठसठशीतपणें केलें आहे. या वाङ्मयाची व्यापकता आश्चर्य वाटावें इतकी विशाल आहे.

समर्थांचें वाङ्मय रचनेच्या दृष्टीनें छंदोबद्ध असलें तरी शैली आणि आशय या दृष्टीनें तें गद्यप्राय आहे. समर्थांच्या स्वभावाला भाषेचा हळुवारपणा, आशयाचा रसाळपणा आणि रचनेची कोवळीक जणू मानवत नसावी; पण समर्थ-वाङ्मयाचें सार म्हणून उल्लेखिलेलें हें मनोबोध प्रकरण मात्र रसाळपणाच्या दृष्टीनेंहि सरस आहे. या प्रकरणाचे पुन्हां वेंचे काढणें हें फार अवघड जातें. अमृत आटवून अर्धे करतां येत नाही; करावें लागत नाहीं, करूं नये; तसेंच येथेंहि होतें.

श्रीविनोबाजींनी आपल्या आवडीप्रमाणे शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्या बोधप्रद वाङ्मयाचें सार काढून, तें निरनिराळ्या नावांनी लहान लहान पुस्तकांच्या रूपानें प्रसिद्ध केलें आहे. पण त्यांनी समर्थांचे हे मनोबोध प्रकरण मात्र सर्वच्यासर्व प्रसिद्ध केलें आहे. त्याचे पुन्हां वेंचे काढले नाहीत आणि त्याच्या प्रस्तावनेंत अशा अर्थाचे म्हटलें आहे की समर्थांचे वाङ्मय ही सोन्याची खाण आहे. त्यातून सोनें पुष्कळ निघते. पण मनोबोध ही सोन्याची खाण नसून जणू सोन्याची लगड आहे. वा सोन्यानें भरलेली तिजोरी आहे असेंहि म्हणता येईल. श्रीविनोबांचा अभिप्राय अगदीं यथार्थ आहे.

मी माझा स्वत:चा अनुभवच सांगतो. पुस्तक सहज खिशांत ठेवण्याजोगें असल्यानें व मूल्यहि कमी असल्यानें प्रवासात वाचण्याकरितां म्हणून बहुधा प्रत्येक वेळी नवे पुस्तक विकत घेतले गेले. आवडलेल्या, चांगले वाटलेल्या श्लोकांवर प्रत्येक वेळी खुणा करीत गेलों. असें ५-६ वेळा तरी झालें. एकदां मनोबोधाची तीं सर्व पुस्तकें कुतूहलानें एकत्र पाहिली तेव्हा आढळले की दोनशें-पांच श्लोकांपैकी १६४-१६५ श्लोकांवर निवडीच्या खुणा आहेत.

तात्पर्य इतकेंच की मनोबोध हें सर्वच प्रकरण फार सरस, आशयघन आणि बोधप्रद आहे. आपण जितक्या वेळां वाचूं तितक्यावेळां निरनिराळेच श्लोक हवेहवेसें वाटतात. असें हें फार सुंदर प्रकरण आहे.

आमचे दादा (सद्गुरु दासगणूमहाराज) हे वस्तुत: समर्थ सांप्रदायाचे; पण त्यांचे विशेष प्रेम श्रीतुकोबारायांच्या गाथ्यावर आणि ज्ञानेश्वरीवर होतें. त्यांत ते अगदी रंगून देहभान विसरायचे. पण तीर्थस्वरूप दादांना मनोबोध हें प्रकरण मात्र फार आवडे.

मनाचे श्लोक सर्व समर्थ-वाङ्मयामध्यें सोपेंपणा, सरसता, ठसठशीतपणा आणि उत्कृष्टपणें केलेले उच्च असें मार्गदर्शन यांनीं ओतप्रोत भरलेले आहेत. या एकाच प्रकरणामध्यें समर्थ आपल्या सर्व सामर्थ्यानिशी उभे आहेत. इतकेंच नव्हे तर श्रीज्ञानेश्वरमहाराज, तुकोबाराय आणि श्रीकबीर यांचीहि भेट याठिकाणी होते आणि म्हणून मनाच्या श्लोकांची गोडी कांहीं वेगळीच आहे.

समर्थांच्या भाषेची गद्यसदृशता आणि भाषाशैथिल्य मनाच्या श्लोकांतहि आढळते. व्याकरणदोषहि अनेकवेळां भेटतात. व्याकरणशुद्ध भाषेच्या कसोटीला हे श्लोक तितकेसे उतरत नाहीत. पण हा दोष केवळ समर्थांचाच आहे असे नाही. श्रीवामनपंडित, रघुनाथपंडित, राम जोशी, प्रभाकर यांचीहि भाषा व्याकरणदृष्ट्या शिथिलच आहे. आमचे ती. दादाहि व्याकरणाकडे फारसें लक्ष देत नसत. व्याकरणाचे नियम गुंडाळून ठेवण्यात या सर्वांनीच पुष्कळ स्वातंत्र्य घेतलें आहे. अपवाद फक्त एक मोरोपंतांचा. त्यांचे सर्व काव्य रचनेच्या दृष्टीने अत्यंत व्याकरणशुद्ध असें आहे. त्यांच्या सर्व काव्यसंभारांत व्याकरणाच्या चुका ४-५ तरी शोधून सांपडतील कीं नाहीं याविषयीं शंका आहे. कविकुलगुरु कालिदास सुद्धां अनेक प्रयोग पाणिनीला सोडून करतो. प्रतिभासंपन्न महाकवींनीं व्याकरणाचा अपमान केलेला नाही हें खरें. पण व्याकरणाच्या निबिड बंधनामुळें भाषेला जडपणा येत असेल तर तोहि त्यानीं येऊ दिलेला नाहीं. समर्थांची भाषा आर्ष म्हणजे ऋषींची, ऋषीला शोभण्यासारखी आहे.

खरोखरीच प्रतिभासंपन्न अधिकारयुक्त वाणीला व्याकरणदृष्ट्या असलेले थोडेसें शैथिल्यहि शोभून दिसतें. निदान मूळच्या सौंदर्यात उणीव आणीत नाहीं, एवढें तरी निश्चित म्हणतां येईल. केंस अगदीं चापून चोपून बांधले तरच चांगले दिसतात असें कांहीं नाहीं. एखाद-दुसरी मोकळी वार्‍यावर भुरभुरणारी केसांची बट सौंदर्य वाढविणारीहि ठरते. याउलट केंस अस्ताव्यस्त आणि पिंजारलेलेहि असू नयेत. भाषेचेंहि तसेंच आहे.

व्याकरणदृष्ट्या शैथिल्य हा दोष खरा पण फारसा महत्त्वाचा नाहीं. आधीं भाषा कीं आधीं व्याकरण? भाषेवरून व्याकरण तयार झाले आहे. त्यामुळें प्रतिभावंत महाकवींना आणि समर्थांसारख्या जनहितासाठीं तळमळणार्‍या सत्पुरुषांना व्याकरणासाठीं धारेवर धरून चालणार नाहीं. मनाच्या श्लोकांतील भाषा व्याकरणाच्या व छंदाच्या दृष्टीनें क्वचित् कोठें शिथिल असली तरी मनोबोधांतील भाषेंत एक प्रकारचे उसळतें चैतन्य आहे, ओज आहे, आवेश आहे, साक्षात्काराचें तेज आहे, जनहिताची तळमळ आहे, सर्वप्रकारच्या मार्गदर्शनाचा नेमकेपणा आहे आणि त्यामुळें हें मनोबोध प्रकरण अतिशय मनोवेधक आणि प्रभावी आहे हें नाकारतां यावयाचें नाहीं.

व्याकरणदृष्ट्या दोष असल्यामुळेंच मनाचे श्लोक प्रभावी ठरले आहेत असें मात्र कृपा करून कोणीं समजूं नये.

मनोबोध हें प्रकरण मुख्यत: २०० श्लोकांचें आहे. पहिला श्लोक नमनाचा आणि शेवटचे चार उपसंहाराचे मिळून हे दोनशेपांच श्लोक आहेत. कांहीं ठिकाणीं मनाचे श्लोक २१० असल्याचा उल्लेख आहे. पण प्रचलित आवृत्त्या तरी २०५ श्लोकांच्याच आहेत. मी २१० श्लोकांची आवृत्ति पाहिली आहे. पण मी विद्वान् नसल्यामुळें मला आवृत्त्यांच्या अशा संशोधनाचें तसें आकर्षण नाहीं.

मनाचे श्लोक हे जर सारभूत वाङ्मय आहे तर तें तरीं एवढे मोठे म्हणजे २०० श्लोकांचे कां असावें? लहानसें सुटसुटीत २५-३० श्लोकांचें कां असू नये? असें वाटण्याचा संभव आहे. तसें असतें तर चाललें नसतें असें मुळीच नाहीं. शंकराचार्यांचीं कित्येक प्रकरणे अशी छोटीं छोटीं पण अत्यंत प्रभावी अशी आहेत. मनोबोध तितका लहान नाहीं आणि सामान्यत: मनुष्यप्रकृतीचा, प्रवृत्तीचा, विचार करतां फार लहान प्रकरणें उपदेश म्हणून पुरेंशीहि ठरत नाहीत. माणसाची बुद्धि, माणसाची प्रवृत्ती, माणसाची परिस्थिति इतक्या विविधतेने भरलेली असते कीं परमार्थाची वाटचाल खरीच करावयाची असेल तर त्याला करावयाचें मार्गदर्शन जरा सविस्तरच करावें लागतें. नवख्या ठिकाणी स्वत: जावयाचें असेल तर पत्ता थोडा सविस्तरच माहीत करून घ्यावा लागतो. षड्रिपु टाकून द्या आणि ब्रह्म जाणा एवढ्या एका वाक्यांत उपदेश करून चालत नाहीं. एवढ्याशा एका वाक्यानें ज्ञान होत असतें तर उपनिषदांतील जी प्रसिद्ध तत्त्वमसि इत्यादि चार महावाक्यें आहेत, तेवढ्यानें माणसाचे सर्वकाळीं व पूर्णपणें भागलें असतें. कारण मूळ सिद्धान्त तेवढाच आहे. अनेक महात्म्यांनीं निर्माण केलेले लक्षावधि ग्रंथ, त्यावरील टीका आणि भाष्यें असें प्रचंड वाङ्मय मग निर्माण झालेंच नसतें. परंतु इतकें थोडक्यांत सांगून माणसाचें भागत नाहीं. बुद्धि असावी तितकी एकाग्र व कुशाग्र नसते. तिला अज्ञान-मोह-आसक्ति अहंकार इत्यादि इत्यादि कारणांनी सतराशेंसाठ फाटे फुटलेले असतात. आणि त्यामुळें बुद्धीचे आहे तें सामर्थ्यहि अनेक प्रकारांनी फाटून विभागलेलें असते. त्यामुळें माणसाची स्थिति "एक धड ना भाराभर त्या चिंध्या कशाला" अशी होते.

दुसरे असें कीं परमार्थ हवासा वाटला तरी संसारांत जो आग्रह असतो, जी जिद्द असते, प्रयत्नाची पराकाष्ठा असते तितकी व तशी परमार्थात नसते. संक्षेप, काटकसर, भागवाभागवी, चालढकल, सारी येते ती परमार्थांच्या माथी. संसाराला वेळ असतो, परमार्थाला नसतो. त्यामुळें अनेक प्रकारचें संशय प्रवृत्ति-परिस्थितीचा परिणाम म्हणून माणसाच्या मनांत डोकावत असतात. त्यांचे निराकरण झाल्याशिवाय आस्था वाटत नाहीं. आस्था वाटल्याशिवाय आग्रह, हट्ट वा जिद्द निर्माण होत नाहीं. संशयाच्या निराकरणासाठीं, शंकांच्या उत्तरांसाठीं, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीं विस्तारानें सांगावें लागतें. विस्तार फार झाला तर त्याचाहि कंटाळा येतो. भार वाटतो. स्पष्टीकरणाच्या, विवेचनाच्या, पटवून देण्याच्या, मन रंगविण्याच्या विस्तारांत मूळ विषय झांकोळून सांपडेनासा होतो. म्हणून शास्त्रकारांनी लिहिणें, बोलणें कसें असावे याचा नियम सांगतांना ``नातिसंक्षेपविस्तरम्'' फार थोडक्यांत सांगू नये व पाल्हाळहि लावूं नये असा आदेश दिला आहे. या आदेशाचें मर्म मनाचे श्लोक रचतांना समर्थांनी नेमकें लक्षांत ठेवल्याचें दिसते. हे जे मनाचे श्लोक वा मनोबोध त्याचा उपयोग काय? या ग्रंथाची फलश्रुति काय? तें स्वत: रामदासस्वामींनींच उपसंहाराच्या शेवटीं अगदीं शेवटच्या श्लोकांत सांगितले आहे. समर्थ म्हणतात,

मनाचीं शतें ऐकतां दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ।
चढे ज्ञानवैराग्य सामर्थ्य अंगीं ।
म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ।।

मनाचे श्लोक ऐकण्याचा परिणाम म्हणून माणसांतील दोष नाहीसें होतात. हे दोष अनेक प्रकारचे आहेत. बुद्धीची चंचलता, मनाचे संकल्प-विकल्प, इंद्रियांची विषयांविषयीची आसक्ति, त्या दृष्टीनें नको तिथे, नको तशा, नको तेव्हां होणार्‍या शरीराच्या हालचाली ही दोषांची मूळ स्थानें. कामक्रोधादि षड्विकारहि यांतच समाविष्ट होतात. हे सगळे दोष मनोबोधाच्या श्रवणाने नाहींसे होऊं लागतात. प्रथमच काय चुकतें तें समजतें. दोष कुठे, कोणते कसे घडतात तें लक्षांत येतें. दोषांना दोष कां म्हणावें तेहि कळू लागले आणि मग अर्थांतच ते टाळायचे उपायहि लक्षांत येतात. दोष टाळणें आवश्यक आहे हें पटू लागतें आणि ते टाळलेच पाहिजेत असा आग्रहहि निर्माण होतो.

ज्यांची बुद्धि मंद आहे त्यांनाहि हें साधूं लागते असें समर्थ म्हणतात. मनुष्याच्या बुद्धीची तीक्ष्णता, निर्मलता, विपुलता माणसामाणसांत वेगवेगळ्या प्रमाणाची असू शकते. पण माणूस म्हणून जन्माला आला कीं त्याला कांहीं ना कांहीं बुद्धीचें देणें लाभलेलें असतेंच असतें. तें उणें–अधिक असेल पण नसतेंच असें कधीं होत नाहीं. त्यामुळें प्रत्येकाला आपली प्रगति करून घेणें शक्य होते व त्यामुळेंच क्रमाक्रमाने माणसाचें ज्ञान वाढूं लागतें. तें टिकविण्यासाठी वैराग्याची आवश्यकता असते हेंहि माणसाला पटतें आणि जें पटतें तें निष्ठेनें आचरणांत आणण्याचें सामर्थ्यहि वाढत जातें.

हें सर्व घडत जातें यांत शंका नाहीं. परंतु त्यासाठीं माणसाचा विश्वास दृढ असावा लागतो. शास्त्र काय, संतांचें बोधप्रद वाङ्मय काय वा सद्गुरूचा उपदेश काय, सर्वच मानवाच्या कल्याणासाठी असतें. परंतु त्यावर जर दृढ विश्वास नसेल तर माणसाच्या हातून व्हावयाचें कोणतेहि प्रयत्न निश्चयानें वा सातत्यानें होत नाहीत त्यामुळें चांगला बोध वा व्यक्तिव्यक्तीची असलेलीहि पात्रता उपयोगास येत नाही. उलट संशयामुळें प्रगति होण्याच्या ऐवजी परागति होत जाते आणि ही घसरण विनाशापर्यंतहि पोंचू शकते. याचकरितां समर्थ म्हणतात– तुमच्यांत कांही दोष असले, तुम्ही मतिमंद असलात तरी तुम्हाला साधन लाभेल, तुमची प्रगति होऊ शकेल. तुम्ही मुक्तीचा, मोक्षाचा कैवल्यसुखाचा अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकाल. पण तुम्ही दृढ विश्वासानें पूर्ण श्रद्धेनें या मार्गाची वाटचाल केली पाहिजे.

प्रगति ही निरनिराळ्या अवस्थाक्रमानें व्हावयाची असते आणि सर्वच माणसे कांही एका पायरीवर, एका पातळीवर असू शकत नाहीत. परमार्थाचा आरंभ काय वा परमार्थाची वाटचाल काय–असाल तेथून पुढती चला या पद्धतीनेंच व्हावयाची असते. आणि धरलेली वाट, न कंटाळतां, आळस व त्यामुळें वाटणारें खोटें समाधान टाळून, चालत राहावी लागते. यासाठी विश्वासाची नितांत आवश्यकता असते.

परमार्थ हा सगळ्यांसाठीं आहे. सगळ्यांना तेथें अधिकार आहे. हें कितीहि खरें असलें तरी प्रपंच धड करण्याचें सामर्थ्यहि ज्यांच्याजवळ नाहीं, तीं माणसें परमार्थात यशस्वी होतील हें गृहीत धरणें चुकीचें आहे. प्रपंचासाठीं जशी बुद्धि लागते तशीच ती परमार्थासाठीहि लागते. थोडी अधिकच लागते म्हटलें तरी चालेल पण प्रपंचावर माणसाचा जेवढा विश्वास असतो, तेवढा परमार्थावर असत नाहीं. आणि म्हणून त्याची कार्यक्षमता प्रपंचांत प्रगट होते, परमार्थांत होत नाहीं. मनुष्याला बुद्धि आणि भावना या दोन गोष्टी लाभलेल्या आहेत. भावनेचा तोल राखण्यासाठीं बुद्धीचा पुष्कळ उपयोग होतो. पण केवळ बुद्धीची वाटचाल वांझोटी ठरते. भावना मात्र ध्येयापर्यंत सरळ पोचूं शकते. पाण्याचा स्वभाव वाहण्याचा आहे, ते समुद्राला मिळेपर्यंत जसें वाहतच राहते मात्र तो प्रवाह वाहता राहील हें पहावें लागतें. तसेंच माणसाच्या भावनेचेंहि आहे.

अत्यंत बुद्धिमान माणसें वैफल्यानें वेडीं झालेलीं आढळतात पण भावनेच्या उत्कटतेचे हे दुष्परिणाम दिसत नाहीत, निदान तितक्या प्रमाणांत तरी दिसत नाहीत. उत्कट भावनेची माणसे सामान्यांच्या दृष्टिकोनांतून अव़्यवहारी ठरतात. त्यामुळें लोक त्यांना वेडे म्हणतातहि. पण त्यांचें तें वेड चांगल्या अर्थानें ध्येयाचें वेड असतें. आणि अशी ध्येयवेडी माणसेच यशस्वी होतात व यशाचा मार्ग घालून देऊंहि शकतात.

विश्वास हें भावनेचेच चांगलें रूप आहे. तो विश्वास ज्याच्या ठिकाणीं आहे त्याच्या प्रयत्नांत कधी उणीव पडत नाहीं आणि त्यामुळेंच तो "याचि देहीं याचि डोळां" मुक्तीचा सोहळा भोगू शकतो.

मुक्ति, मोक्ष, कैवल्य यांचे स्वरूप वर्णन करून सांगणे कठीण आहे. प्रत्यक्ष सरस्वतीला सुद्धां तें सांगता येणार नाहीं असे म्हणतात. अशी ही इंद्रियातीत, परमानंदस्वरूप, अवाङ्मनसगोचर मुक्ति ही साक्षात्काराचा, अनुभवाचा विषय आहे. तीहि प्रत्यक्ष भोगतां येते असें या मनाच्या श्लोकांचें सामर्थ्य आहे असें समर्थ म्हणतात.

खोल वादांत न शिरतां, मनाच्या श्लोकामुळें मनुष्याचें जीवन भव्य, दिव्य, उदात्त, शांत, प्रसन्न, समाधानी, कार्यक्षम, निरलस आणि तेजस्वी होण्याची पूर्ण शक्यता आहे, असे म्हणतां येईल. मात्र त्यासाठी दृढ विश्वास पाहिजे. नुसतें वाचन, नुसते श्रवण हें त्यादृष्टीनें मुळीच पुरेसें नाही. औषधांच्या जाहिराती वाचून वा जाहिरातीचे कागद कोळलेले पाणी पिऊन जसा रोग बरा होण्याची थोडीहि शक्यता नाहीं; तसेच नुसत्या ऐकण्या-वाचण्यानें काहींहि होण्याची शक्यता नाहीं, ऐकण्याच्या मागोमाग मनन, चिंतन आणि आचरण पाहिजेच. विश्वास ठेवावा या म्हणण्यांत तेच अभिप्रेत आहे. पुष्कळ लोक तशी माझी देवावर श्रद्धा आहे म्हणतात, पण ती लबाडी आहे. देवावर श्रद्धा आहे म्हणणार्‍याच्या वर्तनांत संयम आणि सदाचार चढत्या वाढत्या प्रमाणांत दिसलेच पाहिजेत. जेथे खराच विश्वास असतो तेथें शेंडी तुटो कीं पारंबी तुटो अशा निग्रहाने मनुष्य प्रयत्नशील असतो.

मात्र पूर्ण विचार न करतां, खोलवर न जातां कांहीतरी गृहीत धरून वागणें म्हणजे श्रद्धायुक्त जीवन नव्हे. न सोसण्यासारखे सत्य मनुष्य पाहूं इच्छित नाही. ही कांहीं श्रद्धा नव्हे. नीट शारीरिक तपासणी तज्ञाकडून करून घ्यावयाची नाही व स्वत:ला निरोगी समजावयाचें याला कांहीं विश्वास ठेवणे म्हणतां येणार नाहीं. हें भित्रेपण आहे. असो. श्रद्धाविश्वासाचा विषय मनाच्या श्लोकांतून पुढें येणारच आहे. मनाचे श्लोक ऐकण्याकरिता मानसिक सिद्धता कशी असली पाहिजे तें लक्षांत यावें म्हणून फलश्रुतीच्या अंतिम श्लोकाचा उल्लेख केला.

मनाचे श्लोक हे एक स्वच्छ, शीतल सुमधुर जलाचें सरोवर आहे. जिवंत सरोवर आहे. आपल्याला पाहिजे तेवढे पाणी आपण त्यातून घेऊ शकतों. आपली शक्ति, आपली बुद्धि, आपले सामर्थ्य, आपली निकड ही फार मर्यादित आहे. बुटकुल्यांत येणारें पाणी जसें बुटकुलेंभरच असणार तसेच मनाचें श्लोक सांगतांना माझें होणार आहे हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. भांड्यांत पाणी एवढेसें तर येणार, मग सरोवरावर जा कशाला, असे मात्र म्हणूं नये व बुटुकले लहान आहे म्हणून डबक्यांतहि बुडवू नये. मनाचे श्लोक सांगावयाचें ठरविलें तें याच दृष्टीनें. ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात त्याप्रमाणे थोडा पालट करून मीहि म्हणतो कीं `तरी अवधान एकले दीजे । मग सर्व सुखासी पात्र होइजे । हे प्रतिज्ञोत्तर समर्थांचें । उघड ऐका ।।' (ज्ञा. ९।१)

|| Shri Shankar ||

Manobodh - a commentary

We are now going to closely consider the collection of verses by Swāmi Samartha Rāmdās known as Manobodh. This is a small collection of two hundred and five shlōkas, but, it is the essence of the entirety of Samartha's literature. This collection also famously goes by the name of Manāché Shlōk. Samartha's literary output is quite extensive, even enormous. From salt and seasonings in the kitchen to soaring experiences of spirituality, Samartha's literature has vigorously and definitively shown the way on all manner of subjects essential to living. This body of literature is vast and inspires wonder.

Even though the construction of much of Samartha's literature is in meter, its style and substance is more like prose. Soft language, tasteful content and tenderness of construction wasn't perhaps part of his personality, however the essence of his literary contribution, this Manobodh collection, does show tasteful and flowing language. Further removing pieces from this collection is quite difficult. Ambrosia cannot be reduced by boiling, it is not necessary, and shouldn't be. The same applies here.

Shri Vinobāji (Bhāvé), after his own style, considered the instructive literary works of Shankarāchārya, Dnyāneshwar, Nāmdev, Eknāth, and published abridgments as several small books under different names. But even he published Samartha's Manobodh in its entirety. He did not attempt to cherry-pick it in any way. In his preface he states that Samartha's literature is like a gold mine: much gold can be extracted from it. But Manobodh is not a mine, instead it is a cluster of gold nuggets. One might also say it is like a vault filled with gold. Shri Vinobā's opinion is exactly as it is.

Let me relate my own experience. Since a copy of the text easily fits into a pocket, and since it is also quite inexpensive, I purchased a new copy frequently when I needed something to read when traveling. I kept marking those shlōkas that I felt were good and I liked. This happened at least 5-6 times. Once, out of curiosity, when I looked at all of the copies of Manobodh together, I realized that out of two hundred and five, 164-165 of the shlōkas had been marked.

The point is that the whole text of Manobodh is rich with tastefulness, depth of meaning and instruction. We find different shlōkas desirable each time we read it. It is indeed a very beautiful collection.

Our dada (Sadguru Dāgaņu Mahārāj) was of the Samartha tradition, but he especially loved the poetry of Shri Tukobārāyā and the Dnyāneshwarī. He would get totally absorbed in those and forget himself. But our dear late Dada very much liked this Manobodh collection as well.

Across all of Samartha's literature, the Manāché Shlōk collection is brimming full with the highest type of simple, delightful, bold and excellent guidance. Through this singular text, Samartha appears before us in his full glory. Through these verses, one can also meet Shri Dnyāneshwar Mahāraj, Tukobarāyā and Shri Kabir as well, and the Manāché Shlōk also has its own distinct sweetness.

The prose-like, rhythmic but non metrical quality of Samartha's writing, as well as laxity of language is evident in these shlōkas, and one can find several grammatical defects. These shlōkas do not measure up to the standards of grammatical purity. This, however is not a fault unique to Samartha. Shri Vāman Pandit, Raghunāth Pandit, Rām Joshi, Prabhākar, all demonstrate the languid use of language. Our dearly departed Dada also never paid too much attention to grammar. All of them freely took the liberty to roll up and set aside the rules of grammar. A singular exception was Moropant. His poetry displays an exquisite purity of language in its construction. It is doubtful if one can find even 4-5 errors across all of his poetry. The doyen of poets, Kālidāsa also experiments on numerous occasions without hewing to of Pāņinī. For a certainty, these eminently glorious poets have not abused the language. But if abiding by the rigorous rules of grammar were to lead to their language to become dense, they certainly did not permit it to become so. Samartha's language is austere. It belongs to a seer, and as such it suits the seer well.

All in all, when a shining voice comes across with such full conviction, a little bit of slack in observing grammatical rules is actually quite becoming. It certainly does not take away from its inherent beauty. It is not true that the only way to make hair look good is to pull it into a tight bun. A free lock of hair fluttering in a light breeze increases its allure. On the other hand one should not wear unkempt, disorderly hair either. So also for language.

The defect of language vis-a-vis grammatical construction is really not very important. Does language come first, or does grammar? The rules of grammar follow the structure of language. Therefore, to hold eminent poets, and those great souls like Samartha who labored for the well-being of society, to the exacting standards of language is of no value. While the language of Manāché Shlōk is occasionally at odds with metrical structure or grammar, it has the glowing quality of rising consciousness, passion, realization, an intense pursuit of social wellbeing, and the pithiness of powerful guidance. It cannot be denied that this Manobodh collection has a mind-attracting and persuasive quality about it.

Please however, do not misunderstand that the Manāché Shlōk is somehow persuasive because of its grammatical defects.

The Manobodh collection is primarily consisting of 200 shlōkas. The addition of the first shlōka of invocation, and the last four comprising an epilogue make it a collection of 205 shlōkas. There are some references to the Manāché Shlōk consisting of 210 verses, but the edition in circulation consist only of 205 verses. I have come across the edition with 210 verses, but since I am not a scholar, I am not interested in research on the various editions.

If the Manāché Shlōk is a collection representing the essential wisdom, then why is it so large at 200 shlōkas? Why can't it be small and pithy with 25-30 shlōkas? This is a natural question. It is not at all that it could not be so. Several of Shankarāchārya's works are small and very effective. Manobodh is not so small as all that, and typically, when considering a person's nature and tendencies, very small texts frequently are insufficient for the purpose of instruction. A person's intelligence, his proclivity, and his circumstances may be so diverse that if one really needs to be led on a path towards realization, then the method of instruction needs to be elucidated, just as if one needs to go to an unfamiliar destination, one needs a detailed address for the place. One single phrase such as, "discard the six enemies and realize Brahman" is not effective instruction. If indeed a small sentence were sufficient for enlightenment, then the four great sayings from the __Upanishad__s such as "That thou art" etc. would have sufficed completely for humanity and for all time. In fact the main idea is just that. Millions of volumes written by numerous great souls, the critiques and commentaries thereon, and enormous associated literature would have never come into existence. Humans are not satisfied by being told in brief. The intellect is not as focused and sharp as it needs to be. It is competed away through channels such as ignorance, temptation, indiscipline, egotism, and so on. Whatever remaining intellectual prowess is fractured and distributed. Therefore a person's situation is akin to, "एक धड ना भाराभर त्या चिंध्या कशाला" (`Not one good piece of clothing among all these rags').

Secondly, even if ultimate realization is highly sought after, it does not engender the same level or type of insistence, tenacity and desire that worldliness brings. All manner of brevity, frugality, making-do, and putting-off is directed towards the pursuit of realization. There is time for worldliness, and none for the pursuit of realization. Therefore numerous doubts and tendencies motivated by circumstance are entertained in one's mind. Without the resolution of these thoughts, there is no feeling of interestedness. Without interest, there is no emergence of insistence or urgency. To resolve skepticism, answer doubts, and to untangle questions it is necessary to provide an elaborate explanation. Something overtly verbose can become tiresome and dense too. In the midst of providing clarifications, interpreting, persuading and entertaining, the main point can sometimes get obscured or lost. Therefore the great philosophers, when describing the rules for writing and speaking have cautioned us with, नातिसंक्षेपविस्तरम् (``neither too brief nor verbose''). It is evident that Samartha is cognizant of this decree when composing the Manāché Shlōk.

What is the benefit of these Manāché Shlōk or Manobodh? What is the expected fruit of this text? Rāmdās Swāmi himself offers this at the end of the epilogue in the very last stanza. Samartha says,

Defects vanish, hearing these mind-lessons |
The weak of intellect become fit for devotions |
A knowledge-austerity and inner strength awaken |
The servant assures that you will find true freedom ||

The result of listening to Manāché Shlōk is that the faults within a person are diminished. These defects can be of several types. Being scatterbrained, the mind's desires and objectives, indiscretion in the enjoyment of the senses, and the resulting physical movements that occur in the wrong place at the wrong time, these are all the seat of the faults within a person. Anger and lust are also included in here. All of these deficiencies begin to diminish upon hearing Manāché shlōk. We realize where we begin to go astray. Which defects, and where & how they manifest begins to become clearer. We realize why these defects should be regarded as defects in the first place, and as a consequence we begin to understand how to avoid them. That overcoming these defects is necessary becomes clearer, and the urge that we must overcome them begins to grow.

Samartha also says that those with a weaker intellect also begin to come to this realization. It is a given that any one person's intellect differs in sharpness, purity and abundance from another's. However, everyone who is born is nonetheless granted some modicum of intelligence. It may be more or less, but nobody is completely bereft of it. Therefore it is possible for each one to make progress in their own way, and each one is capable of increasing in wisdom in degrees. It also becomes clearer that in order to retain this wisdom, one must necessarily inculcate some dispassion and to dedicate themselves to practicing along the path that they feel a conviction towards.

All this will occur is beyond a doubt. However, it is necessary also for a person to have faith. Philosophical scriptures, the inspirational literature of saints, and the instruction of teachers, all these are for the benefit of humanity. However, in the absence of strong faith, no effort by the hand of man will carry with it the power of decisiveness or consistency, and so any inspiration or the natural gifts bestowed unto him will amount to anything. Instead of progress, skepticism can cause regress and in some cases one may even slip all the way to total ruin. And so, Samartha says that you may have any fault, or you may even be intellectually challenged, even then you will find benefit and you will make progress. You will be able to experience first-hand a sense of complete freedom, \emph{Moksha} or infinite bliss. But, you must walk this path with full faith and complete conviction.

Progress is to be achieved in degrees based on present circumstances, and not everyone can be expected to be at the same stage together. Whether one is at the beginning of the journey towards the prime goal of realization, or has traveled further along the way, progress always constitutes one step forward. Further, one must continue to proceed along the chosen path without tiring, or without indulging in laziness and the illusory satisfaction arising from it. Unending faith is therefore necessary for progress.

Ultimate realization is for everyone. Everyone is entitled to it. However true this may be, it is incorrect to assume that such persons who do not have the wherewithal to controlling the pull of worldly desires will be successful in finding enlightenment. Just as intelligence is required to navigate worldly existence, so also intelligence is necessary for the prime motive. Perhaps it requires even more than a little, because people more readily believe the material world around them, and to a lesser degree in realization. As a result people's accomplishments are more readily attained in the material world, than in their spiritual pursuits. People are blessed with both intelligence and emotion. Intelligence is very useful in keeping control of emotions, but the rational approach alone can be quite dry. Emotions on the other hand have the ability to reach the goal directly. The nature of water is to flow and it does so until it reaches the ocean. All that is necessary is for it to keep flowing. Emotions are much the same.

Extremely intelligent people are sometimes seen to be driven to insanity as a result of failure. But a passionate, emotive person doesn't appear to reach that fate, at least not as frequently. Highly sensitive people may be seen as impractical from the perspective of everyday people and people may even consider them to be mad. But such madness is good if it is in the form of a passion for an objective. Such highly motivated persons find success and can also exemplify a path to success.

Faith is a good manifestation of emotional sensitivity. He who has faith in the right place never finds himself short on effort, and can, "याचि देहीं याचि डोळां" with his own body and his own eyes experience the festival of complete freedom.

Describing the nature of the experience of Salvation, Moksha, Kaivalya is not easy. They say that even Saraswatī herself would not be able to describe it. This freedom, that is beyond all sensual experiences, of the form of pure bliss, and reality without being limited by the body and mind, is a matter of personal realization and experience alone. And Samartha asserts that by means of the Manāché Shlōk, this too can be experienced first hand.

Without getting into a deeper explanation, it can be said here that it is entirely possible that the Manāché Shlōk can lead to a life that is grand, divine, sublime, peaceful, pleasant, contented, competent, energetic and glowing. But for that, one needs strong faith. Mere reading, mere listening is not sufficient to get there. Just like it is not remotely possible to be healed by simply reading an advertisement about a therapeutic, nor can one benefit by drinking a tea made by steeping the paper on which it is printed, so also mere reading and listening is not going to lead anywhere. Right after reading, one must immediately proceed to understanding, meditating upon, and acting upon what is understood. To say that one must have strong faith is to motivate these next steps. Many people will announce their faith in God, but this is a connivance. Any one who confesses a faith in God necessarily demonstrates a progressive growth in discipline and virtue. True faith is evinced in a person's "come-what-may" tenacity in their efforts.

Although without thinking through, without deeply probing and behaving a certain way by merely assuming something or the other, does not constitute a devout life. Intolerable truths aren't something a person wants to confront. This is not faith. Believing oneself to be disease-free without undergoing a complete physical examination from a competent physician cannot be considered believing. It is cowardice. Oh well! The subject of belief and faith will be dealt with later in the Manāché Shlōk anyway. In order to understand the frame of mind necessary when listening Manāché Shlōk, the last shlōk pertaining to the fruit of this practice is mentioned.

Manāché Shlōk is a clear, sweet-water lake. It is brimming with life. We can draw as much water from it as we may. We are limited by our energy, intelligence, capability and our sense of urgency. Just as a small cup can hold only so much water, so also we must remember that that same thing will happen to me as I try to describe the Manāché Shlōk. But please let us not say that since this cup is too small, dipping it in any stagnant pond will do! Thus the decision to share something about Manāché Shlōk. Taking inspiration from Dnyāneshwar Maharaj, and with slight alteration, let me also say, 'Pay heed with attention | the receiver shall be happy | this affirmation of Samartha | Listen freely ||' (Dnya. 9/1)