← Manobodh

Shloka 4

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धि नको रे ।।
मना धर्मता नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सार वीचार राहो ।।४।।

आपल्या मनांत येणार्‍या विचारतरंगांचें आपण कधीं विश्लेषण केलें आहे काय? विश्लेषण करूं गेले तर भय वाटेल असे विचार कितीतरी प्रमाणांत येत असतात. अगदीं नको त्या गोष्टी मनांत येत असतात. असे विचार मनांत येऊं नयेत म्हणून जो जो प्रयत्न करावा तो तो मन नाठाळ मुलासारखे हट्टीपणा करतें. लहान मुलांच्या खोड्या कौतुकानें पहात बसलें तर वाढतात. विरोध केला तर आणखीच उफाळून आल्यासारख्या होतात. `मन चिंती तें वैरी न चिंती' अशी म्हण आहे. तिची यथार्थता कोणालाहि पटावी अशीच वस्तुस्थिति असते. आपल्या अगदीं जवळच्या माणसाबद्दलहि अशा कल्पना मनांत येतात कींr जशा कट्टर शत्रूच्याहि मनांत येणार नाहींत. यासाठीच यजुर्वेदानें "तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु" अशी प्रार्थना कळकळीनें केली आहे. मनांत येणार्‍या वाईट विचारांचा वेग असा विलक्षण असतो कीं परमेश्वर कृपा करील तर त्यांतून सुटका होईल एरवी नाहीं. म्हणून "मदीय हृदयीं सदा शुभ विचार देवा स्फुरो" अशी भगवंताची प्रार्थना करावी लागते.

आपल्याकडे अशी धारणा आहे कीं, अशी श्रद्धा आहे कीं, आकाशांतून कांहीं देवता तथास्तु तथास्तु असें म्हणत गुप्तरूपानें फिरत असतात. आपल्या मनांत कांहींतरीं वाईट विचार यावा आणि देवतांनी तथास्तु म्हणण्यास गांठ पडावी असें होऊं नये. म्हणून वाईट गोष्टी मनांत आणूं नयेत, निदान वाईट बोलूं तरी नये. मनाला चांगलें वळण लावण्याचा प्रयत्न यासाठीं सतत करीत राहिले पाहिजे. मनांतहि वाईट न येणें हा सदाचरणाचा आदर्श आहे.

माणूस दुसर्‍याच्या दु:खानें दु:खी होतो असें पुष्कळ वेळां घडतें, पण माणूस दुसर्‍याच्या सुखानें सुखी होतो असें सहसा होत नाहीं. आपलें बरें न होतां दुसर्‍याचें बरें झालेलें पाहिलें तर त्याच्या मनांत पाप येतें. त्याचा अहंकार दुखावतो; ज्याचें बरें झालेलें दिसतें त्याची हा निंदा करतो. त्याचे दहा दोष दहा लोकांत सांगितल्यावांचून यास चैन पडत नाहीं. लग्नासारखा एकादा कौटुंबिक समारंभ चांगल्यारीतीनें पार पडला कीं मग त्यावर आप्तस्वकीयांकडून होणारी टीका-टिपणी ऐकण्याजोगी असते. शक्ति असती तर माणसानें दुसर्‍याचे वाईट करण्यास मुळींच मागें पाहिलें नसतें. पण अनेक कारणांनीं त्याच्या सामर्थ्याला मर्यादा पडल्यामुळे तो तें घातक कृत्य करू शकत नाहीं. बुद्धींत तर पाप येतेंच; पण तें पांडित्य निंदेच्या रूपानें प्रकट होतें. निंदा हें मत्सराचेंच अपत्य आहे. यासाठीं दुष्टवासना आणि पापबुद्धी यांना मनांत थारा मिळणार नाहीं असा प्रयत्न सदोदित करीत राहिले पाहिजे.

मनाला वळण लावावयाचें तें आपलें आपणच प्रयत्नपूर्वक लावावें लागतें. दुसरा कोणी त्यांत उपयोगी पडूं शकत नाहीं. आधीं विचार, मग निश्चय, नंतर क्रिया असा क्रम असतो. दुष्टवासनेचा परिणाम पापबुद्धींत होतो. प्रत्यक्ष कृतीला जितकीं बंधनें असतात तितकीं ती विचाराला नसल्यानें वाईट विचाराचे धोके आरंभीं तरी लक्षांत येत नाहींत. त्यामुळें वाईट विचारांची खंत वाटेनाशी होऊन पापाविषयीची बुद्धि बळावत जातें आणि ही बलवान् होऊ लागली कीं, मग वागण्यावरील बंधनेंहि ढिली होत जातात. आणि माणूस अनीति करूं लागतो. मनाला आवरणें फारसें हातांत नाहीं. पण शरीर आवरणें पुष्कळसें स्वाधीन असते. म्हणून समर्थ धर्म आणि नीति सोडू नको असा उपदेश मनाला करीत आहेत. मनांत येणार्‍या वाईट वासनांवर नियंत्रण ठेवणें हे फारसें तुझ्या हातांत नाहीं हें आम्हांस माहिती आहे. पण मनांत येणारे वाईट विचार क्रमाक्रमानें नाहींसे होऊन मन शुद्ध व्हावें असे तुला खरोखरींच वाटत असल्यास तुझें प्रत्यक्ष वागणें तरी निदान धर्माला व नीतीला सोडून घडणार नाहीं, अशी दक्षता घे, असे समर्थ म्हणत आहेत.

कबीरांचें एक वचन या दृष्टीनें विचारांत घेण्यासारखें आहे. कबीर म्हणतात– मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर । नहीं खींची कमान तो कहाँसे छूटेगा तीर ।।

एखाद्याचा घात करावा असा विचार मनांत येणें कितीहि वाईट असो प्रत्यक्ष घात-बाण जोडून धनुष्याची दोरी ओढली, बंदुकीचा घोडा दाबला म्हणजे होतो. तेवढे तरी निदान करूं नकोस. मनानें साधत नसेल तर शरीरानें तरी सदाचारांत रहावें. त्याचाहि क्रमानें लाभ होऊं शकतो. पूजा-संध्या-स्तोत्रें, कीर्तन, अन्नदान, तीर्थयात्रा या गोष्टी मनांत येतांच कराव्या. मनांत येत नसल्या, कंटाळा येत असला तरी कराव्या. जमतील, साधतील त्याप्रमाणें करीत राहून अधिकांत अधिक चांगल्या कशा होतील या दृष्टीनें प्रयत्न करावा. पण चांगल्या साधतील तरच करूं नाहीं तर नाहीं असें मात्र म्हणूं नये. मन चांगल्या गोष्टींत रमेल तर उत्तमच, पण तसें होत नाही म्हणून शरीर तरी चांगल्या गोष्टींतून बाहेर काढू नये. चांगल्या गोष्टींतच ठेवावें. कीर्तन-प्रवचनांत मन कधींच रमत नाहीं. म्हणून सर्वदा सिनेमाच पाहतो हें ठीक नाहीं. सिनेमाचे विचार मनांत येत असतील तरी कीर्तन प्रवचनाला वा मंदिरात मधून मधून आग्रहानें जाऊन बसणें हेंच श्रेयस्कर आहे. ``असो नसो भाव । जो हा देखे पंढरीराव'' असें संतानीं म्हटलें आहे तें यासाठींच. मनांत तितकी श्रद्धा नसली तरी पंढरपूरला जा. स्थानांचा कांहीं प्रभाव असतो. वस्तूचेंहि कांही मूल्य असतें. त्यामुळें प्रयत्नांना क्षेत्र उपलब्ध होतें.

धर्मानें आणि नीतीनें वागतांना आपली प्रकृति, प्रवृत्ति, परिस्थिति विचारांत घेतली पाहिजे. आदर्शाचीं शास्त्रवचनें शब्दश: विचारांत घेऊन चालणार नाहींत. यासाठींच समर्थांनी सार काय, महत्त्वाचें काय, गौण कोणतें, अपरिहार्यपणें आचरणांत आणलेंच पाहिजें असें काय आहे त्याचा विचार करावा, विवेक करावा असें सांगितलें आहे. माणसाचा स्वभाव मोठा विचित्र आहे. सार काय, असार काय, याचा विवेक जर केला नाहीं तर चांगल्या गोष्टींतहि विकृति निर्माण होते. संन्यासधर्म एरवीं फार कडक. कोणत्याही इंद्रियाचे लाड त्या आश्रमांत चालणार नाहींत. इंद्रियनिग्रह हाच तेथे नियम. पण विवेकानंदांनीं संन्याशाला कांहीं सवलती दिल्या आहेत. तंबाखू खाणें ही त्यातील एक सवलत. माणसाला कोठेंच कोणतीच सवलत दिली जात नाहीं तर तो सर्व बंधनें झुगारून देण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून कमी धोक्याच्या गोष्टींत सवलत द्यावी व अधिक धोक्याच्या गोष्टी कटाक्षानें टाळण्यास सांगाव्या असा विचार त्यांनी येथें सांगितला आहे. माझ्या माहितीचें एक उदाहरण सांगतों. एका दशग्रंथी कर्मठ ब्राह्मणाचा मुलगा लहानपणापासून अत्यंत कडक शिस्तींत, हें खाऊं नको, असें करूं नको, या बंधनांत वाढला. त्या बापड्याला कांदा-लसूण तर राहोच पण गाजर-वांगेंहि वर्ज्य होते. पुढें तो महाविद्यालयांत शिक्षणासाठीं शहरांत आला आणि इतका स्वैर वागूं लागला कीं कांदा-लसूणच काय पण मद्यमांसही त्याला वर्ज्य राहिलें नाही. सर्व समाजच्या-समाज नियमाच्या बंधनांत जेव्हां काटेकोरपणें पण सहजतेनें वागत असतो तेव्हा आपण स्वत: पाळत असलेले नियम जाचक वाटत नाहींत, नव्हे थोडे अधिक नियम पाळणेहि भूषणाचेंच वाटतें, पण कोणतेच नियम न पाळणारा समाज भोंवती असतांना फार कडक नियमांचा दुराग्रह धरणें, हे घसरगुंडीला लावण्यास कारणीभूत ठरणारें आहे. कांदा व मांस यामधें कांद्याची सवलत देणें इष्टच मानलें पाहिजे. आपल्याकडचे कांहीं कडक नियम मंत्रशक्तीच्या जपणुकीसाठीं होते. खाद्याखाद्य, स्पर्शास्पर्श हा त्यांतीलच एक भाग होता. गेल्या हजार-बाराशें वर्षांत तरी ब्राह्मणानें समाज म्हणून मंत्रशक्तीचा आधार शिल्लक ठेवला आहे असें दिसत नाहीं. त्यादृष्टीनें असलेले विधिनिषेध आज इतके कटाक्षानें पाळावेत की नाहीं याचा विचार केला पाहिजे. अधिक वाईट टाळण्यासाठीं कमी वाईटाचा विचार करणेंहि पुष्कळ वेळां इष्ट ठरते. ``नियमेंविण राहू नयें'' हें खरेंच पण त्यावेळीं `फार नियम करू नये' हेंहि लक्षात ठेवलेंच पाहिजे. चांगलें कितीहि चांगलें असलें तरी तें पचावें लागतें. त्याचें अजीर्ण होऊं देतां कामा नये. अधिक चांगल्याकडून कमी चांगल्याकडे येण्यापेक्षां कमी चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे जाणे जास्त चांगलें.

उद्योग-व्यवसायांत असलेल्या एका गृहस्थानें विष्णुसहस्त्रनामाचें १२ पाठ करण्याचें एकदां ठरविले. एका पाठाला ८ ते १० मिनिटें लागतात. दोन पावणेदोन तासाचा वेळ आपण सहज देऊं शकूं, असा त्याचा विचार, पण हें गणित प्रत्यक्ष व्यवहारांत उतरूं शकलें नाहीं. १२ पाठ पुरे न होण्याचा अनुभव आल्यामुळें त्याचें पाठ करणेंच सुटले. त्यानें एकच पाठ करावयाचें ठरविलें असतें तर त्याचा नियम कदाचित् पार पडला असता. आपली शारीरिक, मानसिक शक्ति किती? आपल्याला किती झेपेल याचा विचार करून नियम ठरवावे लागतात हेंच यांतलें सार होय. त्याचा विचार माणसानें केलाच पाहिजे.

Oh mind let not desire lead me to evil action |
Oh mind let not always lead to thoughts of sin ||
Oh mind let not my ethos be abandoned |
Oh mind instead remain in vital introspection ||4||

Have we ever analyzed the thoughts that rise up in our minds? An analysis should scare with the kinds of thoughts we often think. So many thoughts that occur in our minds are unwelcome. Whatever may we try in order to prevent such thoughts from arising, the more the mind throws a tantrum like a spoiled child. If you are display amusement at the mischief of a child, you will encourage more mischief. If you try to suppress the mschief, the child will find ways to create even more. There is a saying that goes, `The mind thinks thoughts that even an enemy would not'. The reality is that most everyone will see the truth in this. Sometimes, such thought arise even about those closest to us that might not arise in the minds of our most bitter enemy. Thus the prayer in the \emph{Yajurveda} that implores, "May the intentions in my mind be pure". The torrent of evil thoughts that arise can be so tremendous that nothing but the grace of God can bring escape. Thus we pray to the Lord, ``Lord may auspicious thoughts always animate this heart of mine".

We have a tradition, a belief that deities secretly wander the skies, granting wishes by saying, `so be it, so be it'. It would be rather unfortunate if an evil thought arose in the mind only to coincide exactly with one of these deities' blessings granting fulfillment! We must therefore resist bringing up evil thoughts, and at the least avoid saying them aloud. We must therefore constantly strive to train the mind into a positive bent. The non-occurrence of evil in a mind is the very model of a pious life.

It is a common occurrence that one person becomes saddened at the sorrow of another. It is not very common for one person's joy to become the cause of another's joy. A person who sees someone else experiencing a good turn while he himself does not brings evil to his mind. His ego gets hurt. He then casts aspersions towards the fortunate one. He is not satisfied until he has shared ten faults of the person with ten other people. When a family event such as.a wedding has been successfully pulled off, there is a crude pleasure in listening to criticisms and commentary coming from those closely affiliated with it. If he were capable, man would never have looked back before visiting evil on another. He is often unable to commit grave acts because many circumstances will have placed limits on him. Surely evil arises in the mind, but it gets expressed as witty criticism. Criticism is the offspring of envy. We must therefore constantly condition the mind so that evil desires and sinfulness cannot germinate in it.

Training the mind into order is something we must do by ourselves and with our own effort. No one else can help us there. The process first involves deliberation, followed by decision and finally action. Evil desire turns into the intent to do harm. Since our thoughts are relatively unrestrained compared to the sheer number of limitations on our ability to act, the dangers of evil intent are not recognized in its early stages. As regret for harboring evil desire disappears, desire turns into an intent to commit sin, and as this intent gets stronger, the bonds on action also become loose. Man turns towards iniquity. Tempering the mind is not so much in our hands, but controlling the body is a lot more feasible. And therefore Samartha counsels the mind not to relinquish befitting conduct and customs. It is as if he is saying, ``Reigning in the rising thoughts of evil desire in the mind is not something you are capable of, I am aware. But if you truly feel that you would like your mind to become purified with the progressively diminishing of such thoughts, then you must ensure that at least your behavior should not stray from propriety and ethics''.

Kabir has a saying that is worth noting in this regard. He says, "If the mind goes, let it, don't let the body consent. How can the arrow release, when the bow stays unbent?"

The desire to cause harm to someone, while a truly evil thought, the arrow of harm can only actually be released if one pulls back on the bowstring, or when one pulls the trigger on a gun. At least refrain from doing that. Even if the mind cannot abide, let the body conduct itself with decency. That can also be beneficial in degrees. Worship-service-prayer, devotionals, donating food, pilgrimage, such things should be done as soon as their thought arises in the mind. Even if they don't occur, even if one feels lazy, one should do such things. They should be done in whatever manner, as much as possible, and to try to do them to best one one's ability. Moreover, one should not shirk from doing them using the ruse that one cannot do them well. It is best if the mind can get absorbed in good things, but even if not, one should not withdraw the body from good things. Just because devotional songs and sermons aren't interesting doesn't follow that one should instead just watch movies all the time. Even if the mind dwells upon the cinema, one should attend sermons and talks, and urge oneself to visit the temple once in a while since that is sound. The saints have therefore said, "Faith present or not, to visit Pandharirao you ought". Visit Pandharpur even if the mind lacks faith. The place has an effect. The thing has value in and of itself, and so effort is rewarded with opportunity.

When acting appropriately and ethically, one must take into account one's own constitution, tendencies and circumstances. One must not take the commandments of one's role model literally. Thus Samartha asks us to look for the essence, and determine for ourself what is important, what is irrelevant, and what is indispensable and must be committed to. Man's nature is strange. If one does not discern what is essential and what is inconsequential, even good things can become distorted. Becoming a renunciate monk is very strict. That way of life does not tolerate any indulgence of the senses. Controlling sensual pleasures of all kinds is the rule there. But even Vivekānanda has made some allowances, such as the use of chewing tobacco. If every small indulgence is proscribed then it creates the possibility for a person to rebel against and discard all such injunctions. The idea here is that an allowance of a less dangerous indulgence is helpful to practicing the renunciation of a more dangerous one. Let me share an example of someone I know. The son of a very scrupulous learned Brahmin was raised in a very strict discipline since childhood. He grew up among several don't eat that', don't do that' prohibitions. Not only onions and garlic, but carrots and eggplant was forbidden to him. Later he went to the city to study at the university and began to behave so unrestrained a manner that not just onions and garlic, he also began indulging in drink and meat. When the entire society is accustomed to living in austerity within the bounds of regulations, then one's own self-imposed restraint does not feel so notable. In such a case increasing the severity of one's repressions feels honorable. But when living in a society that abides by no restraint, the self-imposition of very severe prohibitions is likely to slide backwards. Between onions and meat, we must accept that onions are the lesser evil. In our tradition, some strict rules were established in order to protect scripture. What to eat, what not to eat, what to touch, what not to touch, all these were part of that. In the last thousand-twelve hundred years or so it doesn't appear that Brahmins have upheld the power of the scriptures for the good of society. It is worth pondering therefore if following the injunctions to the letter is relevant any more. Permitting small evils in order to guard against greater ones can turn out desirable. While it is true that "one should not live lawlessly," it is also important to remember that "one should not restrict oneself too much". No matter how virtuous something is, it still needs to be digestible. It should not prove unwholesome. It is better to go from lesser good to greater good, than to go from greater good to lesser.

Once a family man who ran a business decided to memorize the 12 chapters of the Vishnusahasranāma (Thousand names of Vishnu). One chapter needs 8-10 minutes. He thought he could easily commit about a couple hours, but the mathematics didn't work out for him. Because he found that ti was difficult for him to read through the 12 chapters, he just gave up on memorizing them. If instead he would have committed to memorizing only one chapter, perhaps he would have accomplished following his own rule. What is our physical and metal capacity? The essence is that we should take into account our own capability before we set down rules for ourselves.